राष्‍ट्रवादीचे अध्‍यक्ष शरद पवार ३० जुलैला धुळे दौऱ्यावर

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे : येथील काही कार्यकर्ते आणि दानशूरांच्या आर्थिक योगदानातून राष्ट्रवादी भवनाचे नूतनीकरण झाले आहे. यासंदर्भात होणाऱ्या कार्यक्रमास पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार  हे ३० जुलैला येथे दौऱ्यावर असतील, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष  अनिल गोटे यांनी पत्रकाव्दारे दिली 
राष्ट्रवादी  भवनाच्या नूतनीकरणाबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी श्री. गोटे यांच्याशी मुंबईत चर्चा केली. तसेच या कामाबाबत समाधान व्यक्त केले. यासंदर्भात कार्यक्रमाच्या तयारीसाठी श्री. गोटे यांनी मंगळवारी साक्री, बुधवारी शिंदखेडा, गुरूवारी शिरपूर, शुक्रवारी  धुळे शहर व तालुका दौरा आणि शनिवारी मुख्य कार्यक्रमास उपस्थिती, असे नियोजन केले आहे. यानुसार पक्ष कार्यकर्त्यांनी त्या- त्या विश्रामगृहात दुपारी एकला उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

असा आहे कार्यक्रम

खासदार पवार हे २९ जुलैला सायंकाळी सातला नाशिकला दाखल होतील. तेथून ते ३० ला सकाळी साडेआठला धुळ्याकडे निघतील. त्यांचे सकाळी साडेअकराला आगम होईल. मिरवणुकीने ते दुपारी बाराला गुलमोहर विश्रामगृहात उपस्थित होतील. दुपारी साडेबारापर्यंत ते शिष्टमंडळे व कार्यकर्त्यांशी हितगुज साधतील. नंतर दुपारी पाऊण ते अडीचपर्यंत राष्ट्रवादी भवनाच्या नूतनीकरणाचे अनावरण त्यांच्या हस्ते होईल. पत्रकारांशी संवादानंतर ते दुपारी साडेतीनपर्यंत मल्हार बागेत असतील. तेथून नाशिकला रवाना होतील, अशा नियोजीत दौऱ्याची माहिती श्री. गोटे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default