जालना : भाजपा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत आसतात. त्यांच्या भाषाशेलीमुळे संपुर्ण राज्यभरात ते दाजी या नावाने परिचित आहेत. रावसाहेब दानवे यांच्या हटके लुकमुळे त्यांची चर्चा होते, तर कधी राजकीय क्षेत्रात किंवा सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या वक्तव्यांवरुन त्यांची चर्चा होत राहते. त्यांची भाषाशैली बेधडक आणि रांगडी आहे. त्यामुळे दानवे "दाजी" म्हंटल की चर्चा तर होणारच असं काही समीकरण झालं आहे.
रावसाहेब दानवे यांच्या मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या मुलाचा आज विवाह समारंभ होता. या लग्नसोहळ्यासाठी दानवे उपस्थित राहिले होते. यावेळी दानवे उपस्थिती लावणार असल्याने वधू आणि वर पित्याकडून दाजींची व्यवस्था ही करण्यात आली होती.
विवाह मतदार संघातच असल्यामुळे काय दाजी दाखल झाले अन चक्क वऱ्हाडी मंडळींसह मंडपात जाऊन जमिनीवर जाऊन बसले. शिवाय मुलगा-मुलगी विवाह मंडपात येताच दाजी पटकन उठले अन नवंदांपत्याच्या विवाह सोहळ्यात चक्क अंतरपाट धरायला जाऊन उभे राहिले.
बाप्पा करा सुरू', म्हणत देव बाप्पाला मंगळ अष्टक म्हणायला लावले. चक्क केंद्रीय मंत्र्यांनी विवाह सोहळ्यात उपस्थित राहून अंतरपट धरल्याने चर्चा तर होणारच ना? या वेळी दानवे यांनी नवं दापत्यास शुभाशीर्वाद देऊन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा ही दिल्या. त्यामुळे आता इतरवेळी सत्तेचा सारीपाटात आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असणारे दानवे आज मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मुलाच्या लग्नात आंतरपाट धरल्याने चर्चेत आले आहेत.
