पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आष्टी शहरात मेडिकलचा परवाना नसतानाही विघ्नहर्ता एजन्सी नावाचा फलक लावून, त्या दुकानावर गर्भपाताची औषधी विक्री केली जात होती. याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळली होती. यावरून औषध निरीक्षक विलास दुसाने यांनी टीमसह बोगस मेडिकलवर छापा टाकला. यादरम्यान त्या मेडिकलमध्ये गर्भपातासाठी वापरली जाणारी एमटीपी किटस्ची बेकायदेशीर विक्री केल्याचे उघडकीस आले.
चिठ्ठीशिवाय चढ्या दराने विक्री
डॉक्टरांच्या
चिठ्ठीशिवाय चढ्या दराने औषधी विक्री केल्याचे देखील निष्पन्न झाले. तर यावेळी गर्भपाताची 8 हजार रुपयांची औषधी देखील मिळून आले. विशेष म्हणजे विघ्नहर्ता मेडिकलचा परवाना नसताना विघ्नहर्ता एजन्सी असा फलक लावून औषधी विक्रीचा व्यवसाय केला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली. दरम्यान याप्रकरणी बीडच्या आष्टी पोलीस ठाण्यात औषधी विक्रेता बिभीषण आण्णासाहेब पडोळे (रा. आष्टी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.