तोतया सीबीआय अधिकाऱ्याच्या छाप्याचा मास्टर माइंड निघाला भाजपचा माजी पदाधिकारी

फुले शाहू आंबेडकर
0
औरंगाबादच्या पैठण येथील माजी नगराध्यक्ष तथा भाजपच्या युवा मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष सुरज लोळगे यांच्या दुकानावर रविवारी एका तोतया 'सीबीआय'च्या अधिकाऱ्यांने रेड केल्याची घटना समोर आली होती. तर लोळगे यांच्या समयसूचकने या तोतया 'सीबीआय'च्या अधिकाऱ्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र या सर्व घटनेचा खरा मास्टर माइंड भाजपचा एक माजी पदाधिकारी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. रघुनाथ इच्छैय्या असे या मास्टर माइंडचे नाव आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default