अमरावती: अमरावती जिल्हा हा भाई सलोख्याचा जिल्हा आहे, त्या जिल्ह्याला प्रयोगशाळा कोण बनवत असेल तर आम्ही तसे होऊ देणार नाही. उदयपूरच्या घटनेसारखी घटना अमरावतीमध्ये झाली २८ तारखेला उदयपूरची घटना झाली. अमरावती मधील भाजप प्रणीत आमदारांनी २७ तारखेचे पत्र दिले. अमरावतीला भाजप आतंगवादी व धर्मांध शक्तीची प्रयोगशाळा बनवत आहे का, असा सवाल काँग्रेस नेत्या यशेमती ठाकूर यांनी केला.
माजी पालकमंत्री व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी आज खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर गंभीर आरोप केले. अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड राणा दाम्पत्याच्या जवळचा आहे, असा आरोपही ठाकू यांनी यावेळी केला.
राणा दाम्पत्याचा प्रचार याच इरफान याने केला आहे. उदरपूरची घटना २८ ला घडली. त्यापूर्वीच २७ ला खासदार नवनीत राणा यांनी पत्र दिले. कोल्हे यांच्या हत्येची एनआयए चौकशी करा. कारण उदयपूरची घटना दोन्ही सेम आहे. याबाबत नवनीत राणा यांचे पत्र 27 ला आले आहे. २८ जून रोजी उदयपूरची घटना घडली. त्यापूर्वीच २७ जून रोजीच याची कल्पना नवनीत राणा यांना होती का असा सवालही यशोमती ठाकूर यांनी केला.
हा सगळा सुनियोजित प्लॉन आहे. अमरावतीच्या कोल्हे प्रकरणात राणा दाम्पत्यासह खासदार अनिल बोंडेना अटक करा. राणा दाम्पत्य व अनिल बोंडे यांना अटक करून त्यांची चौकशी करा अशी मागणीही काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी केली. देशातील अनेक मोठ्या घटनांमध्ये भाजपचा हात दिसत आहे. उदयपूर मधील घटनेची लिंक अमरावतीतून होते. या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली.
