अंतिम वेतन प्रमाणपत्रासाठी लाच; सहा हजार रूपये घेताना ताब्‍यात

फुले शाहू आंबेडकर
0
शिरपूर : अंतिम वेतन प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात सहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या कनिष्ठ सहाय्यकास धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेताना रंगेहात पकडले. 
शिंदखेडा पंचायत समिती अंतर्गत वाघाडी खुर्द येथे ग्रामसेवक पदावरून पदोन्नती होवून शिरपूर पंचायत समिती येथे ग्रामविकास अधिकारी पदावर विराजमान झालेल्या संबंधित तक्रारदाराकडून अंतिम वेतन प्रमाणपत्र देण्यासाठी संबंधित लाचखोर कनिष्ठ सहाय्यकने सहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या संदर्भात संबंधित तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

कनिष्‍ठ सहाय्यक रंगेहात सापडला

त्यानंतर धुळे शहरातील दत्त मंदिर चौक येथे संबंधित लाचखोर कनिष्ठ सहाय्यकास पैसे घेण्यासाठी बोलावले. त्या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून संबंधित कनिष्ठ सहायकास लाचेची रक्कम घेताना रंगेहात अटक केली आहे. धुळे लाचलुचपत विभागाच्या कारवाईमुळे लाचखोर सरकारी बाबूंचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default