मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून दोन गटात सुरुवातीला बाचावाची झाली. या बाचावाचीचे रूपांतर नंतर दोन गटात हाणामारीमध्ये झाले. पोलीस प्रशासनातर्फे तात्काळ फौजफाटा तैनात करण्यात आल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली आहे. सध्या संपूर्ण गावामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासनातर्फे फौजफाटा तैनात करण्यात आला असून कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये; याची संपूर्ण काळजी पोलीस प्रशासनातर्फे घेतली जात आहे. त्याचबरोबर कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील पोलीस प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे. यासंदर्भात निजामपूर पोलीस ठाण्यामध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या चौघा जणांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले आहे.
पोलिस ठाण्याबाहेरच आणला मृतदेह
मृताच्या नातेवाईकांनी संबंधिताचा मृतदेह हा काही काळ निजामपूर पोलीस ठाण्याच्या बाहेर आणून ठेवला होता. जोपर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना ताब्यात घेण्यात येत नाही. तोपर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवणार नाही; अशी काहीशी भूमिका संतप्त नातेवाईकांनी घेतली होती. परंतु पोलीस प्रशासनातर्फे तात्काळ संबंधितांना अटक करण्यात आल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
