प्राप्त माहितीनुसार, ऋतुजा शिंदे ही विद्यार्थीनी NEET परीक्षेचा अभ्यास करत होती. ऋतुजाला बारावी परीक्षेत चांगले गुण मिळाले होते. त्यामुळे तिने NEET परीक्षेची तयारी सुरू केली होती. मात्र पहिल्या परीक्षेत तिला कमी गुण मिळाले. त्यामुळे ऋतुजाने पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षेची तयारी केली.
दरम्यान परीक्षा एका दिवसावर आली असताना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ऋतुजाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ऋतुजाने नेमकी आत्महत्या का केली? याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही.
मात्र, परीक्षेच्या तणावातून तिने आत्महत्या केली असल्याचा अंदाज नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. ऋतुजा अभ्यासात प्रचंड हुशार होती. तसेच तिचा स्वभावही मनमिळावू होता. तिने असं अचानक टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
