अश्लील फोटो टाकून ब्लॅकमेलिंग; पीडितेकडून मागितली खंडणी

फुले शाहू आंबेडकर
0
जळगाव : शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असणाऱ्या २२ वर्षीय तरुणीला अज्ञात व्यक्तीने व्हॉट्‌सॲपवर अश्लील मॅसेज पाठवून खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरात रामानंदनगर पोलिस  ठाण्याच्या हद्दीत २२ वर्षीय तरुणी कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करते. ८ ते १६ जुलै असे आठ दिवस पीडितेच्या व्हॉटस्ॲप क्रमांकावर तिचे फोटो एडिट करून सोबत इतरांचे अश्लील फोटो पाठवत विनयभंग केला. तिचे फोटो सोशल मीडियात  व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केली. तरुणीने तातडीने जळगाव सायबर पोलिस  ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. तरुणीच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default