अजित पवारांचा वाढदिवस साजरा करताना राष्‍ट्रवादीच्‍या कार्यकर्त्यांत जुंपली; काय आहे कारण वाचा

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन गटांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचबरोबर ओबीसी आरक्षणासंदर्भात  जल्लोष साजरा करण्यासाठी एकवटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या  कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली 
धुळे  शहरातील राष्ट्रवादी भावनाच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले असून या इमारतीच्या उद्घाटनासाठी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाध्यक्ष  शरद पवार हे 30 जुलैला धुळ्यात येणार आहेत. याच इमारतीच्या नूतनीकरणासंदर्भात कुठलाही विचार न घेतल्याचे म्हणत डावलल्याचा राग मनात धरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गटात हा वाद उफाळून आला आहे. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना शाब्दिक मारा करत मनातील राग बोलून दाखविला.

उद्घाटनाच्या दिवशीही उफाळू शकतो वाद

पक्षप्रमुख शरद पवार यांच्या दौऱ्यापूर्वीच अशा पद्धतीने पक्षातील वाद उफाळून येत असल्याने उद्घाटनाच्या दिवशी देखील याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बऱ्याच कार्यक्रमांमध्ये पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत दोन गटात वाद उफाळल्याचे बघावस मिळाले आहे. पक्ष प्रमुख शरद पवार यांच्या दौऱ्यापूर्वी हे वाद मिटतील का? याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default