लीलाबाई ग्यानसिंग बारेला (वय २५, रा.धवली ता.वरला जि.बडवानी, सध्या गोरगावले शिवार, चोपडा) असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी ग्यानसिंग बारेला हा त्यांच्या पत्नी लीलाबाई बारेला यांच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन सतत मारहाण करत होता. मयत व फिर्यादी टेम्बर्या मन्साराम बारेला (वय २३, रा.रा.धवली ता.वरला जि.बडवानी,सध्या गोरगावले शिवार, चोपडा) यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून भांडण झाल्याने आरोपी याने रागाच्या भरात पत्नी लीलाबाई बारेला हिच्या डाव्याकानावर व कानाच्या मागे लोखंडी कोळपणीने वार केला. दरम्यान, लीलाबाई या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, आरोपी ग्यानसिंग बारेला हा पसार झाला आहे.
प्रकरणी टेम्बर्या मन्साराम बारेला यांनी चोपडा ग्रामीण पोलिसांत फिर्याद दाखल केली. घटनास्थळी सहा पोलीस अधीक्षक ऋषिकेच रावले, पोलीस निरीक्षक देविदास मधुकर चोपडा. यांनी भेट दिली. त्यानुसार भादंवि कलम ३०२ प्रमाणे आरोपी ग्यानसिंग बारेला यांच्याविरुद्ध गुन्हा झाला आहे. पुढील तपास सहा पोलीस अधीक्षक ऋषिकेच रावले करत आहेत.
