दहिगाव येथील प्रमुख चौकात असलेले स्टेट बँकचे एटीएम मशिन २७ जुलैच्या रात्री चोरट्याने फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी झाला. दहिगाव येथील प्रमुख चौकात असलेले एटीएम फोडले असल्याचे सकाळी स्टेट बँक ग्राहकांच्या लक्षात आल्यानुसार तत्काळ त्यांनी पोलिस पाटील संतोष पाटील व सरपंच अजय अडकमोल यांना कळविले. त्यानुसार त्वरित दोघांनी यावल पोलिसात पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांना कळविल्यानुसार पोलिस निरीक्षक व विभागीय पोलिस अधिकारी डॉ. कृणाल सोनवणे यांनी भेट देऊन ग्रामपंचायतीने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. त्यानुसार एका संशियतास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
७० हजाराचे नुकसान
एटीएमच्या कक्षात कुठलीही बेल किंवा कुठलीही सुरक्षा नसल्यामुळे या संधीचा फायदा चोरट्याने घेतल्याचे दिसून येत आहे. एटीएमचा पत्रा तोडून लॉक व पैसे काढण्याचा पट्टा तोडलेला आहे. एटीएममधील सुमारे ६० ते ७० हजार रुपयांचे नुकसान चोरट्याने तोडफोड करून केलेले आहेत. पोलिसांनी ग्रामपंचायत कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे व मार्गाची तपासणी केली. त्यानुसार एकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली जात आहे.
