दुर्दैवी! नागपुरात खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू
शुक्रवार, जुलै २९, २०२२
0
नागपूर: नागपूरात खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पृथ्वी मार्कंडे असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. डिपट्टी सिग्नल ते शांतीनगर दरम्यान भियारी मार्गासाठी हा खड्डा खोदला होता . हे खोदकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले होते. पण हे काम गेल्या अनेक दिवसांपासून थांबले होते.
या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. काल पृथ्वी हा मुलगा आपल्या मित्रांसोबत खेळायला गेला होता. यावेळी त्याचा खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे निष्पाप मुलाचा बळी गेल्याने परिसरातील नागरिकांचा रोष व्यक्त होत आहे.
डिपट्टी सिग्नल ते शांतीनगर दरम्यान, भियारी मार्गासाठी हा खड्डा खोदला होता. हे खोदकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले होते. पण हे काम गेल्या अनेक दिवसांपासून थांबले होते. पावसाचे पाणी या खड्ड्यात साचले होते.
Tags

