अंबरनाथ शहर हादरले; सख्ख्या भावंडांवर दिवसाढवळ्या गोळीबार

फुले शाहू आंबेडकर
0
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये आज, शुक्रवारी खळबळजनक घटना घडली. सख्ख्या भावंडांवर दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला. यात एकाचा मृत्यू झाला आहे. व्यावसायिक वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे 
अंबरनाथमध्ये  दिवसाढवळ्या गोळीबार करून एकाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. शिवाजीनगर परिसरात आज, शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. तुषार गुंजाळ असं या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. व्यावसायिक वादातूनअंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर परिसरात शिवसेना शाखेसमोर आज दुपारच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली.  तुषार गुंजाळ आणि गणेश गुंजाळ या दोन सख्ख्या भावांवर हा हल्ला करण्यात आला. यापैकी तुषार याला गोळी लागल्यानं त्याचा या घटनेत मृत्यू झाला, तर गणेश याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने त्यात तो जखमी झाला. हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
एका कारमधून दोन ते तीन जण आले होते. त्यांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. तर हा प्रकार जुन्या व्यावसायिक वादातून घडल्याचा संशय पोलिसांना आहे. या हल्लेखोरांचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default