बीड : अवैध धंदा करण्यासाठी कोण, कधी, कशी शक्कल लढवेल याचा नेम नाही. असाच काहीसा प्रकार बीडच्या संभाजीनगर पोलिसांनी उघडकीस आला. डाक पार्सलच्या नावाखाली कंटेनरमधुन लाखोंच्या गुटख्याची वाहतूक केली जात होती. याबाबतची गुप्त माहिती मिळाल्यानंतर संभाजीनगर पोलिसांनी याचा पर्दाफाश केला आहे. आज पहाटे केलेल्या कारवाईत साडेदहा लाखाच्या गुटख्यासह 9 लाखाचे कंटेनर पोलीसांनी पकडले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून हरियाणा (
पासिंग असणारा कंटेनर (क्र. HR55 T-4271) घेऊन चालक परळी शहरात आला होता. या कंटेनरवर डाक पार्सल असे मोठ्या अक्षरात लिहिले होते. गुप्त माहिती दारामार्फत मिळालेल्या माहितीवरून या कंटेनरची तपासणी केली असता कंटेनरमध्ये गुटखा आढळून आला. दरम्यान आरोपी चालक सरफराज अहेमद दारुद (वय 35, रा. तपकन ता. नुहु जि. मेवाड, हरीयाणा) यास ताब्यात घेत त्याच्यावर कलम गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१९ लाखाचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी केलेल्या कारवाईत कंटेनरमध्ये 28 मोठे बोरे आढळून आले. त्यामध्ये तब्बल 224 सुगंधी गुटख्याची पोटे मिळून आली आहेत. यात पोलिसांनी तब्बल 19 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.