कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे आरोग्य विभागातर्फे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करावे, त्याचबरोबर ज्या नागरिकांनी अद्यापही कोरोनाची लस घेतली नाही; अशा नागरिकांनी तात्काळ आपले लसीकरण करून घेण्याचे देखील आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.
धुळे येथे दिवसभरात आढळले दहा कोरोनाबाधित; रुग्णांची संख्या वाढल्याने चिंताही वाढली
बुधवार, जुलै ०६, २०२२
0
धुळे : धुळे जिल्ह्यामध्ये कोरोनाचा आलेख दिवसागणित वाढताना दिसून येत आहे. सध्या धुळे जिल्ह्यामध्ये ६४ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. यात सोमवारी दहा कोरोना बाधित रुग्णांची भर पडली असल्यामुळे धुळेकरांच्या तसेच आरोग्य विभागाच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे
Tags
