साक्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता. यामुळे साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये बहुतांश ठिकाणी जलमय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश जलसाठ्यांमध्ये पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पांझरा, मालनगाव, नामखेडी व बुराई हे प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. तर अक्कलपाडा धरणातून देखील मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १६१ मीमी पाऊस जलसाठ्यांच्या पाणी पातळीत वाढ
मंगळवार, जुलै १९, २०२२
0
धुळे : यंदा पावसाचे आगमन जिल्ह्यात उशिरा झाले असले तरी गेल्या आठवडाभर झालेल्या पावसाने मात्र प्रकल्पांमधील जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शिवाय जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास 161.2 मी.मी इतका पाऊस झाला आहे.
Tags
