खार पोलीस स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी रुम सर्व्हिस बॉय म्हणून अंधेरी पूर्वेतील एका हॉटेलमधील रुमचं दार ठोठावलं. एका २२ वर्षीय तरुणीनं दार उघडलं. तिनं २४ तास काहीच खाल्लेलं नव्हतं. स्वत:ला संपवण्याच्या हेतूनं तरुणी हॉटेलमध्ये आली होती. पोलिसांना तिच्याकडे ब्लेड, सुरा आणि स्कार्फ सापडला.
तरुणीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिची चौकशी केली. तरुणी नर्स म्हणून पश्चिम उपनगरातील एका रुग्णालयात काम करत असल्याचं चौकशीतून समजलं. डिसेंबर २०२१ पासून तरुणी नर्स म्हणून काम करते. अतिशय जास्त काम असल्यानं ती तणावाखाली गेली. पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या मदतीनं तरुणीला शोधून काढल

तरुण नर्सनं हॉटेल रिसेप्शनला तिची खरीखुरी ओळखपत्रं दाखवली होती. २७ जुलैला ती हॉटेलमध्ये गेली. नर्स कामावर नसल्याचं लक्षात आल्यानं रुग्णालयाकडून पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली. २७ जुलैला संध्याकाळी ४.३० वाजता नर्स बेपत्ता असल्याची तक्रार रुग्णालयाकडून नोंदवली गेली.
अतिशय जास्त काम असल्यानं ताण आल्याचं तरुणीनं पोलिसांना सांगितलं. काही दिवसांपासून मनात सातत्यानं आत्महत्येचे विचार येत होते. आपण का जगत आहोत, असा प्रश्न पडत होता, असं तरुणीनं सहायक पोलीस निरीक्षक संतोष कानसे यांना सांगितलं. तरुणीला वाचवणाऱ्या पोलीस पथकात कानसे यांचा समावेश होता.