शरद पवार यांच्या दौऱ्याआधीच राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद येणार चव्हाट्यावर

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार  यांच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वाद चव्हाट्यावर येण्याचे चिन्ह दिसू लागली आहेत. यापूर्वी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री जयंत पाटील  यांच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत गटबाजीतील वाद चव्हाट्यावर आला होता
त्यानंतर आमदार रोहित पवार यांच्या दौऱ्यादरम्यान देखील अंतर्गत गटबाजीचा वाद हा उफाळून आल्याचे पहायला मिळाले होते. त्यानंतर आता स्वतः शरद पवार यांचा आज धुळे दौरा असतानाच त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरून पुन्हा या दोन गटातील वाद चव्हाट्यावर येण्याचे चिन्ह बघावयास मिळत आहे.

शहरात लावण्यात आलेले स्वागताचे बॅनरवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रंजीत भोसले यांच्या बॅनरवर माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांचा उल्लेख नाही तसंच त्यांचा फोटो देखील नाही. त्याचबरोबर त्यांच्याशी निगडित असलेल्या कुठल्याही कार्यकर्ते देखील या बॅनरवर फोटो किंवा उल्लेख करण्यात आलेला नाही.

तसंच दुसरीकडे माजी आमदार तथा राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे  यांच्या देखील बॅनरवर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांचा फोटो देखील नाहीये आणि त्यांच्याशी निगडित कुठल्याही कार्यकर्ताचा देखील फोटो नाहीये या दोन बॅनर वरून या दोन गटातील वाद पुन्हा बघावयास मिळत आहे.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसमोर पक्षाच्या अंतर्गत असलेला वाद चव्हाट्यावर आलेला असतानाच या वेळेस देखील हा वाद उफाळून येणार का याकडेच संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default