प्रेमसंबंधातून डोके दगडाने ठेचून युवतीचा खून

फुले शाहू आंबेडकर
0
नागपूर : एका २० वर्षीय तरूणीच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना काटोल तालुक्यातील चारगावजवळ उघडकीस आली. अद्याप तरुणीची ओळख पटली नसून प्रेमसंबंधातून युवतीचा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी चारगाव रस्त्यावरून काही वाहने जात असताना त्यांना एका २० वर्षे वयोगटातील तरूणीचा मृतदेह दिसला. एका
युवकाने गाडी थांबवून पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. काही वेळातच काटोल पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तरूणीचे डोके दगडाने ठेचले होते. तिला फरफटत खेचून आणल्याचेही स्पष्ट दिसत होते. पोलिसांनी तरूणीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी  रवाना केला.
या प्रकरणी अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरूणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला का?, तरूणी गर्भवती होती का? याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

खून दुसरीकडे, विल्हेवाट चारगावात

मृत तरूणी ही तालुक्याबाहेरची असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे तरूणीचा खून दुसरीकडे करण्यात आला असून फक्त मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी चारगाव परिसराची निवड केली असावी. हा मृतदेह मध्यरात्रीच्या सुमारास फेकण्यात आल्याची शक्यता आहे. टोलनाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस तपासाची दिशा ठरवित आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default