गॅस कटरने चोरट्यांनी कापले एटीएम; साडेपाच लाखांपेक्षा अधिकची रक्कम लंपास

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे तालुक्यात दोन ठिकाणी चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. एका एटीएम मशिनवर प्रयत्‍न फसल्‍यानंतर अन्‍य एटीएमकडे मोर्चा वळवून या मशिनमधील कॅश लांबविण्यात चोरट्यांना यश आले.
धुळे  तालुक्यातील फागणे येथे चोरट्यांचा प्रयत्न फसल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा कापडणे येथे असलेल्या एटीएमकडे वळवला. त्याठिकाणी चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने इंडिकॅश बँकेचे एटीएम  फोडले आहे. त्यामधून जवळपास साडेपाच लाखांहून अधिकची रक्कम चोरट्यांनी चोरून पोवारा केला आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

सकाळी परिसरातील नागरिकांच्या हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर तात्काळ  पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. पोलीस प्रशासनातर्फे विविध तपास यंत्रणासह पोलीस पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले असून सोनगीर पोलिसांतर्फे आता या एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांचा तपास केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default