जीवघेणा शॉर्टकट बोगदा नागरिकांसह विद्यार्थ्यांना करावी लागते कसरत

फुले शाहू आंबेडकर
0
पारोळा  : बस स्थानकापासून शहरात जाणारा कोणताही रस्ता नव्‍हता. यामुळे तटबंदी तोडून शॉर्टकट रस्ता करण्यात आला. मात्र तो शॉर्टकट रस्ता पादचाऱ्यांसह वाहनधारकांना जीवघेणा ठरू पाहत आहे. 
गेल्या अनेक वर्षापासून या शॉर्टकट रस्त्याच्या वापर नागरिक पारोळा शहरात जाण्यासाठी करीत आहे. मात्र या शॉर्टकट रस्त्याकडे आज देखील दुर्लक्ष केले जात आहे. रस्त्याच्या आतून सांडपाणी जात असल्याने या परिसराचा नेहमीच ओलावा असतो. तसेच पादचारी व वाहनधारकांच्या एकदम गर्दीमुळे मातीची केलेली भर ही पडून त्याचा काहिसा भाग पाण्यात गेला आहे. तसेच गेल्या अनेक दिवसापासून  पावसाच्या रिपरिपमुळे या भागात पाणी साचल्याने भाग ढासळला गेल्याने तो जीवघेणा ठरवून पाहत आहे.
शॉर्टकट बोगद्याचा तोडलेला भाग बऱ्याच वर्षापासून जीर्ण झाला असून तो कधी ढासडेल हे सांगता येणार नाही. यासाठी जीवघेणा ठरू पाहणारा शॉर्टकट बोगदा रस्‍त्‍याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे पादचाऱ्यांकडून बोलले जात आहे. बसस्थानक हे राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे प्रवाशांना ये जा करण्यासाठी शॉर्टकट बोगदा सोडला. तर कजगाव रस्त्याकडून शहरात जावे लागते. पर्यायाने वेळ व पादचार्‍यांना एवढ्या लांबून शहरात येण्याचे अंतर गाठावे लागते. त्यामुळे असंख्य पादचारी व दुचाकी चालक शॉर्टकट बोगद्याच्या रस्त्यातून ये– जा करीत असतात. तसेच या रस्त्यातून अनेक शाळा असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणातून येजा करताना दिसतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default