बारावीच्या विद्यार्थिनीची आश्रमशाळेत आत्महत्या, पोलिसात मृत्युची नोंद

फुले शाहू आंबेडकर
0
जव्हार : विक्रमगड तालुक्यातील आश्रमशाळा साखरे येथील बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने बुधवारी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना दुपारी १२ ते ३ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.
शासकीय आश्रमशाळा साखरे येथे खुडेद कुडाचा पाडा येथील बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आश्रमशाळेत बुधवारी गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी विक्रमगड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू असून, पोलिस निरीक्षक प्रदीप गिते अधिक तपास करीत आहेत. साखरे येथील शासकीय आश्रमशाळेत याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे पालकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default