शिवसेनेतील बंडापुढे उद्धव ठाकरे नरमले द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत मोठं वक्तव्य

फुले शाहू आंबेडकर
0
राज्यातील सत्तातरानंतर शिवसेनेचे अनेक नगरसेवकही शिंदे गटात सहभागी होत आहेत. याशिवाय खासदारही बंडखोरीच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत. यादरम्यान आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी पत्रकार परिषद घेत संवाद साधला आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्त्वाची वक्तव्ये केली आहेत.
द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यायचा की नाही हे खासदारांसोबत बोलून ठरवेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं हे विधान अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे.
माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. येत्या १२ तारखेला सुनावणीचा निकाल येईल तो शिवसेनेच्या भविष्याचा निकाल नसेल. पण या केसमुळे देशात लोकशाहीचं भविष्य किती काळ मजबूत राहणार आहे. आंबेडकरांच्या घटनेनुसार कारभार होणार आहे का हे सांगणारा हा निकाल असेल. हा निकाल देशाच्या लोकशाहीची वाटचालीची दिशा दाखवणारा निकाल ठरेल, असंही ठाकरे म्हणाले 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default