औरंगाबादेत खळबळ 3 महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या डॉक्टर तरुणीची आत्महत्या

फुले शाहू आंबेडकर
0
औरंगाबाद - जिल्ह्यामध्ये डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबाद  जिल्ह्यामध्ये डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. तीन महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह केलेल्या डॉक्टर तरुणीने अभियंता पतीच्या त्रासाला कंटाळून पाच दिवसांपूर्वी स्वतः रक्तवाहिनित इन्सुलिनचे इंजेक्शन घेतले होते, तेव्हापासून तिच्यावर गाठी रुग्णालयात  उपचार सुरू होते.
मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी शहरातील सातारा पोलीस ठाण्यात पतीसह सासू-सासरे आणि दिराच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. डॉक्टर तरुणीच्या खोलीत पाच पानांची सुसाईड नोटी सापडल्याची माहिती मिळत आहे. 'मम्मी पप्पा मला माफ करा' असे तीने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. सुशिक्षित डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
डॉक्टर तरुणीचे धनंजय मोरे यांच्यासोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनीही तीन महिन्यांपूर्वी लग्नही केलं होतं. पण लग्नाच्या काही महिन्यांतच डॉक्टर तरुणी तणावाखाली होती आणि त्यामुळे पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. या घटनेमुळे तरुणीच्या आईवडिलांसह नातलगा या घटनेनं धास्तावले आहे. या सुसाईट नोटच्या आधारे औरंगाबाद पोलीस पुढील तपास करत असून या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default