सांगलीच्या खानापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या व्यापाऱ्यांचा विटा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी आरोपींकडून तब्बल ४७ लाखांची रोख रक्कम हस्तगत केली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना पुणे व मुंबई येथून अटक केली आहे. पुणे औंध येथील द्राक्ष एक्सपर्ट कंपनीचे चालक व मालक असल्याचे भासववून खानापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना यांनी गंडा घातला. याप्रकरणी चिखलहोळ येथील धनाजी शामराव यमगर यांनी विटा पोलिसांत फिर्याद दाखल केली होती.
यमगर यांच्यासह अन्य १४ शेतकऱ्यांना अहमदनगर जिल्ह्यातील गणेश सुधाकर बारसकर व प्रवीण नारायण फटांगरे यांनी शेतकऱ्यांकडून द्राक्षे खरेदी केली होती.ती परस्पर विकून त्याचे पैसे शेतकऱ्यांना न देताच त्यांनी पलायन केले होते. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु करुन आरोपींना अटक केली, अशी माहिती पोलीस निरिक्षक संतोष डोके यांनी दिली.
