नस्ली वाडिया यांच्या हत्येचा कथित कट रचल्याचे प्रकरण :मुकेश अंबानींना वाचवण्याचा सीबीआयचा प्रयत्न ; आरोपीचा दावा

फुले शाहू आंबेडकर
0
अंबानी यांना आरोपी करण्यापासून तसेच १९९० मध्ये त्यांनी नोंदवलेल्या जबाबाच्या आधारे त्यांच्याविरोधात तपास करण्यापासून सीबीआयला कोण रोखत आहे, असा प्रश्नही सिक्वेराने उपस्थित केला आहे. मुकेश अंबानी हेच या कथित कटाचे मुख्य सूत्रधार असल्याचे आणि सीबीआय रिलायन्सच्या पिंजऱ्यातील पोपट झाले आहे असा आरोपही त्याने केला. या प्रकरणी वाडिया यांची साक्ष नोंदवण्यात आली होती. त्याचा आणि अंबानी यांनी १९९० मध्ये सीबीआयला दिलेल्या जबाबाचा विचार केल्यास उद्योगपतीच्या आदेशानुसार सहआरोपी कीर्ती अंबानी याने वाडिया यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा निष्कर्ष काढता येईल, असा दावा सिक्वेरा यांना न्यायालयात केलेल्या अर्जात केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default