परभणी शहरातील खंडोबा बाजार परिसरात सदरची घटना घडली आहे. पैश्याच्या वादातून दोन मित्रांनी 30 वर्षीय तरुणाचा रात्री खून केल्याची घटना घडली. शेख रफिक शेख चांद असे या मयत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकारणात फेरोज खान आणि शेख शाहरुख यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आरोपींवर कठोर कारवाईसाठी मयतांच्या कुटुंबियानी टाहो फोडला. पोलिसानी दोन्ही आरोपी शोध सुरू केला आहे.
3/related/default
