नागपुरात खळबळ! शहरात व्यक्तीची धारदार शस्त्राने दिवसाढवळ्या हत्या

फुले शाहू आंबेडकर
0
नागपूर : नागपुरातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. शहरात पुन्हा एकदा दिवसाढिवळ्या हत्येची घटना घडली आहे. रस्त्याच्या अगदी मध्यस्थानी एका व्यक्तीची धारधार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. गिट्टीखदान पोलीस स्टेशन आणि गुन्हेशाखा कार्यालयाच्या काही अंतरावर ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नारायण गयाप्रसाद द्विवेदी असे मृत व्यक्तीचे नाव आहे
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गजबजलेल्या काटोल रस्त्यावर सकाळी मृतक नारायण गयाप्रसाद द्विवेदी हे दुचाकीने ड्युटीवर जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. आरोपींनी नारायण द्विवेदी यांच्यावर अनेक वार केल्याने ते दुचाकीसह रस्त्यावरचं कोसळले,त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आरोपी हे घटनास्थळावरून पसार झाले. जुन्या वादातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आरोपींनी नारायण गयाप्रसाद द्विवेदी यांची हत्या केल्यानंतर मृतदेहाचा मोबाईलवर फोटो काढून तो मित्राला पाठवला. त्यांनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नारायण द्विवेदी हे सुरेंद्रगड वस्तीत भाड्याने राहत होते. मात्र,घर मालकाच्या मुलाचे वर्तन योग्य नसल्याने त्यांनी ती खोली रिकामी करून दुसऱ्या भागात राहण्यास गेले होते. त्या वादातून नारायण द्विवेदी यांची हत्या झाल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default