कोरोनाच्या 2 वर्षानंतर मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. संदेश दळवी हे विलेपार्ले पुर्वेतील शिवशंभो गोविंदा पथकात सहभागी होता. दहीहंडी मनोरे रचताना संदेश दळवी 7 व्या थरावरुन कोसळला. थरावरुन कोसळल्याने संदेश जखमी झाले. त्याला त्वरीत नानावाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मावळली.
संदेश दळवी हा मुळचा विलेपार्लेकर. मात्र काही महिन्यांपूर्वी दळवी कुटुंबिय कुर्ल्यात कोहिनूर हॉस्पिटल जवळील भागात शिफ्ट झाले होते. संदेश 3 भावंडांपैकी सर्वात सहान होता.
मुंबई आणि ठाण्यात एकूण 170 गोविंदा जखमी
दरम्यान दहीहंडी उत्सवात मुंबई आणि ठाण्यात एकूण 170 गोविंदा जखमी झाले. या 170 मध्ये मुंबईतील गोविंदाचा आकडा हा सर्वाधिक आहे. मुंबईत 137 जणांना दुखापत झाली. तर ठाण्यात थर रचताना 37 जण जखमी झाले होते.
