ग्रामस्‍थांनी पाठलाग करून पकडला नऊ लाखांचा गुटखा

फुले शाहू आंबेडकर
0
वाकोद  : जळगाव-औरंगाबाद महामार्गावर २ जुलैला सायंकाळी वाकोद ग्रामस्थांनी पाठलाग करून लाखो रुपयांचा गुटखा वाहून नेणारा टेम्पो पकडला. मात्र, पहूर पोलिसांनी या प्रकरणात तब्बल २४ तासानंतर बुधवारी वाहनचालक व मालकावर गुन्हा दाखल केला असून, वाहनातून ९ लाख ६० हजारांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. तसेच मुद्देमालासह वाहनही ताब्यात घेतले आहे
जळगाव - औरंगाबाद  महामार्गावर वाहतूक पोलिसांच्या तपासणी दरम्यान २ जुलैला सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान पिंपळगाव- पळसखेडा फाट्याजवळ जळगाव वाहतूक पोलिसांनी बोलेरो पीकअप वाहन (एमएच १९, सीवाय ६८८१) अडवून चौकशी केली असता चालकाची वागणूक संशयास्पद आढळून आली. वाहनात काय माल आहे? असे विचारताच वाहन चालकाने तेथून धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. त्यांचा पाठलाग करत वाहतूक पोलिसही मागे वाहन घेऊन निघाले. बेदरकारपणे दोघांनी वाहने भररस्त्यावर चलविल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

पोलिसही म्‍हणाले चटई आहे

टेम्पो चालकाने यू -टर्न घेऊन महामार्गावर वाहन लावून शेतातून मार्ग काढीत पळ काढला. सुरवातीला वाहतूक पोलिसांनी त्यात चटई असल्याचे पत्रकारांना सांगितले. त्यानंतर पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी हजर झाले असता जागेवर पंचनामा करा, अशी मागणी करून देखील त्यांनी वाहन पोलिस ठाण्यात न्यावे लागेल, असे सांगितले. यामुळे यात नेमके काय शिजत आहे? अशी सर्वांना शंका होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default