चिंताजनक : एकाच महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणीसह ३ तरुण बेपत्ता
शनिवार, ऑगस्ट ०६, २०२२
0
अकोला : एकाच महाविद्यालयामध्ये शिकणारे तीन तरुण आणि एक तरुणी मागील एक ऑगस्टपासून बेपत्ता झाले आहेत. १ ऑगस्टला चौघेही घरून कॉलेजला जातो म्हणून गेले होते. मात्र, तेव्हापासून ते परतलेच नाहीत. चौघेही अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या व्याळा येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिकत आहेत.
बेपत्ता झालेल्यांमध्ये अकोला जिल्ह्यातील तिघांचा तर बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथील तरुणाचा देखील समावेश आहे. तुळशी अनिल ताले वय १८ , राहणार रेणुका नगर, डाबकी रोड, अकोला, प्रतीक मनोहर तायडे वय २१ रा.अडगाव बु. ता.तेल्हारा, जि. अकोला, हर्ष विष्णू घाटोळ वय १७ वर्ष पळशी खुर्द ता.खामगाव, जि.बुलढाणा आणि प्रफुल पांडुरंग लंगोटे वय १९, राहणार न्यू भीम नगर, कृषी नगर, अकोला अशी बेपत्ता विद्यार्थ्यांची नावं आहेत.
हे चौघे बेपत्ता असल्याची तक्रार बाळापुर आणि सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. हे चौघेही बाळापुर तालुक्यातील व्याळा येथील मानव सिटी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत
सोमवारपासून घरून कॉलेजमध्ये गेले होते. मात्र, अद्याप ते घरी परतलेले नाहीत. हे चौघेही कुठे दिसून आल्यास तात्काळ अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख यांना संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. ७०२०८२१७८५ आणि ९८५०५२८८८५ या मोबाईल क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

