धुळ्यात पुन्हा गॅंगवार; पैशांच्या वादातून एकाची गोळी झाडून हत्या

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे : धुळ्यात पुन्हा एकदा गँगवार झाला असून अग्निशस्राद्वारे गोळी झाडून एकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. धुळे शहरातील कुमार नगर भागात राहणाऱ्या चिनू पोपली या ३९ वर्षाच्या व्यक्तीची दोन अज्ञातांनी गोळीबार करत हत्या केल्याची खळबळजनक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ही हत्या पैशांच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं आहे तर एक जण अद्याप फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. शहरातील कुमार नगर भागात चिनू पोपली हा त्याच्या कुटुंबासह वास्तव्य करतो. तो रात्री घरी नसताना त्याच्या घरी आलेल्या काही जणांनी त्याच्या पत्नीला चिनू कोठे आहे याबाबत विचारणा केली. मात्र, त्यांनी बाहेर गेल्याचे सांगितल्यानंतर संशयीत दुचाकीवरून निघून गेले. घरी आलेल्या त्या संशयीतांबाबत चिनू पोपली याच्या पत्नीने त्याला फोनवरून माहिती दिली, व काही वेळातच चिनू घराजवळ आल्यानंतर काही जण पुन्हा परत आले व त्या ठिकाणी त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वादातच त्यांनी थेट आपल्याजवळील रिव्हॉल्व्हर काढून चिनू पोपली याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात चिनू जागीच कोसळला त्यानंतर या सर्वांनी त्या ठिकाणाहून पोबारा केल्यानंतर पत्नी व परिसरातील नागरिकांनी चीनूला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु तोपर्यंत चिनूचा मृत्यू झाला होता. या संदर्भात घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व दोघा संशयतांना ताब्यात घेतले असून पुढील तपास धुळे शहर पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default