विहिरीत उडी मारीन, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही - नितीन गडकरी

फुले शाहू आंबेडकर
0

 भाजपाच्या कार्यकारिणीतून पत्ता कट झाल्यापासून नितीन गडकरी वारंवार आपल्या विधानांमुळे चर्चेत येत आहेत. नागपुरात शनिवारी एका कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. तेव्हाचं त्यांचं विधानही आता चांगलंच चर्चेत आलं आहे. आपल्या विद्यार्थी दशेतला हा किस्सा त्यांनी सांगितला आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान न मिळाल्यावर गडकरींनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र ते भाजपा सोडून काँग्रेस किंवा अन्य पक्षात जाणार नाहीत, हे मात्र त्यांनी स्पष्ट केलंय. गडकरींनी सांगितलं की, जेव्हा ते विद्यार्थी नेता म्हणून काम करत होते. तेव्हा काँग्रेस नेते श्रीकांत जिचकर यांनी गडकरींना काँग्रेसमध्ये यायची ऑफर दिली होती. त्याबद्दल सांगताना गडकरी  म्हणाले की, मी श्रीकांतला सांगितलं की मी विहिरीत उडी मारून जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही. कारण मला काँग्रेसची विचारधारा आवडत नाही.

नितीन गडकरींनी नुकतंच एक विधान केलं होतं. ज्यात ते म्हणाले होते की, कधीकधी आपल्याला राजकारण सोडण्याची इच्छा होते. कारण आयुष्यात इतरही अनेक गोष्टी आहेत. आजकाल राजकारण सामाजिक परिवर्तनाचं माध्यम बनण्याऐवजी सत्ताकारणात गुंतत चालले आहे. गडकरी असंही म्हणाले होते की, पुढच्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपण आपले पोस्टर्स लावणार नाही, कोणाला काही देणार नाही. जर तुम्हाला मतदान करायचं तर करा नाहीतर नका करू.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default