मुंबईत 20 वर्षीय मुलाने 17 वर्षीय मुलीसोबत मैत्री करून तिला लैंगिक अत्याचार, बलात्काराची भीती दाखवत दीड लाख उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मुलीसोबत शारिरीक संबंध ठेवत काही खाजगी फोटो काढले होते. हे फोटो प्रसिद्ध करण्याची भीती दाखवत त्याने पैसे उकळले. या आरोपी मुलाला माहिमच्या शाहू नगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी वांद्रे पूर्व भागातील रहिवासी आहे. त्याच्यावर पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल आहे. सध्या त्याला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
पिडीत मुलीची आरोपीशी इंस्टाग्राम पहिल्यांदा भेट झाली. तेथेच त्यांनी मोबाईल नंबर एकमेकांना दिले. पाहता पाहता त्यांची मैत्री वाढली. पुढे मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झाले. मागील वर्षी हे जोडप एकत्र फिरायला बाहेरगावी गेले होते. तेव्हा 17 वर्षीय पीडीतेवर आरोपी मुलाने बलात्कार केल्याचा दावा केला जात आहे. काही महिन्यांनी त्याने तिला 'आक्षेपार्ह स्थिती' मधील काही फोटोज, व्हिडिओ दाखवले.
त्याच्यावरून पिडीतेला ब्लॅकमेलिंग करण्याचे, बलात्कार करण्यास सुरूवात झाली. पिडीतेकडून त्याने एक सेकंड हॅन्ड बाईक आणि तीस हजारांचा स्मार्ट फोन देखील घेतला. मुलीच्या पालकांनी तक्रार केली असून त्यांच्या दाव्यानुसार, पालकांचा आरोप आहे की पिडीत मुलीने व्यवहार केले आहेत. पालकांनी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून शेवटी पोलिसांकडे धाव घेतली.

