दहा महिन्यांंच्या मुलीचे अपहरण करणारा संशयित ताब्यात

फुले शाहू आंबेडकर
0

अपहरण झालेल्या १० महिन्यांच्या चिमुरडीचा अवघ्या २४ तासांच्या आत मध्यवर्ती गुन्हे शाखेतर्फे  शोध घेऊन तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि,सोनि युवराज पवार (रा. गौरी पंटागण ,नाशिक) यांची १० महिन्याची मुलगी गायत्री युवराज पवार हिचे गौरीपंटागण येथून अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त, नाशिक शहर जयंत नाईकनवरे व पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संजय बारकुंड यांनी गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांना सदर अपहृत मुलीचा शोध घेण्यासाठी आदेशित केले.

यावरून मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वपोनी डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हेशाखेचे उपनिरीक्षक माणिक गायकर,उपनिरीक्षक सुनिल माळी, हवालदार श्रीराम सपकाळ, संजय गामणे,आनंदा काळे यांनी बस स्थानक,रेल्वे स्टेशन,बाजारपेठ आदी वर्दळीच्या ठिकाणी अपहृत मुलीचा शोध घेतला.

त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित मकरंद भास्कर पाटील (रा. आनंद छाया अपार्टमेंट, सातपुर कॉलनी, नाशिक) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सदरहू मुलीचे अपहरण केल्याचे कबूल केले.पोलिसांनी अपहृत मुलीस संशयित पाटील याच्या घरून ताब्यात घेऊन तिच्या पालकांच्या स्वाधीन केले व संशयित पाटील यास पुढील तपासकामी पंचवटी पोलिसांना सुपूर्द केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default