यावेळी पालक मेळावा घेण्यात आला. कैलास वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की आपला परिसर व स्वतःची स्वच्छता ठेवावी, खोटे बोलू नये, दारू गुटखा व्यसन करू नये व कोणी घ्यायला पाठवल्यास जाऊ नये असा संकल्प करण्यात आला. तर मुख्याध्यापकांनी भारताला स्वातंत्र्य कसे मिळाले याचा इतिहास विद्यार्थी व उपस्थित गावकऱ्यांना विधीत केले.
गावात 13 ऑगस्ट पासून हर घर तिरंगा अभियानांतर्गत रॅली व प्रत्येक घरावर तिरंगा लावणे. व तिरंग्याची काळजी घेणे. याबाबत जनजागृती कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका व ज्येष्ठ गावकरी यांच्यावतीने घेण्यात आले आहे. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त जिल्हा परिषद शाळेतील मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम करून सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच घरांवर लावलेला तिरंगा सन्मानाने शाळा प्रशासनाकडे परत करावा असे आवाहान मुख्याध्यापक यांनी केले आहे.
