तापी नदीत आढळले पती – पत्नीचा मृतदेह; आत्‍महत्‍या की घातपात, कारण अस्‍पष्‍ट

फुले शाहू आंबेडकर
0
भुसावळ शहराजवळच्या तापी नदीच्या पात्रात पती– पत्नीचे मृतदेह आढळून आले आहेत. पोलिसांना पती-पत्नीने आत्महत्या  केल्याचा संशय व्‍यक्‍त केला जात आहे. या संदर्भात भुसावळच्या  शहर पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरू होते. 
भुसावळ शहराच्या जवळून वाहत असलेल्‍‍या तापी नदी पात्रात दोन मृतदेह तरंगतांना आढळून आले. सदर मृतदेह वसंत नेमाडे (वय ६५) आणि मालतीबाई वसंत नेमाडे (वय ५६) या पती- पत्नीची असल्याची ओळख पटली आहे. त्यांनी तापी नदीच्या पुलावरून  उडी घेऊन स्वत:चे जीवन संपविल्याची माहिती समोर आली आहे.

कारण अस्‍पष्‍ट

रविवारी त्यांनी नदी पात्रात उडी घेतल्याची शक्यता असून सोमवारी मृतदेह आढळून आले. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन केले. त्यांनी बामणोद येथून दुचाकी घेवून तापी नदीवरून उडी घेतल्याचे समोर आले आहे. नेमाडे दाम्पत्याने आत्महत्या नेमकी कशासाठी केली याचे कारण अद्याप समजलेले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default