पोळा सणाच्या दिवशी मेहरगाव या गावातील दलितांवर सवर्णंकडून सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्याचा संताप जनक प्रकार उघडकीस आला होता. यानंतर याबाबत मेहरगावच्या ग्रामपंचायत सरपंचांनी मात्र याबाबतचे सर्व आरोप फेटाळले आहेत. सोशल मीडियावर अफवा पसरवून गावातील वातावरण बिघडवण्याचे काम समाजकंटकातर्फे सुरू असल्याचा आरोप देखील सरपंचांनी केला आहे. तर दलित संघटनांतर्फे समाजकंटकांना राजकीय पुढारी मंडळीच प्रोत्साहित करीत असून आपली राजकीय पोळी राजकीय मंडळीतर्फे भाजली जात असल्याचा आरोप लावण्यात येत आहे
पोलिस प्रशासनाकडून कारवाईचे आश्वासन
गावामध्ये जातीभेद निर्माण करणारा कुठलाही प्रकार घडला नसल्याचे सरपंचांचे म्हणणे असून जाणीवपूर्वक गावात समाजात तेढ निर्माण केला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे पोलीस प्रशासनातर्फे पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी ग्रामस्थांना सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचे आवाहन केले असून यासंदर्भात तपास सुरू असून कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही व दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे देखील आश्वासन दिले आहे.
