आज भाऊराया घरी आला,’ राखी बांधल्यानंतर वेश्या वस्तीमधील महिलांची भावुक प्रतिक्रिया

फुले शाहू आंबेडकर
0

नाशिक  : बहीण-भावाच्या प्रेमाच्या आणि अतुट नात्याला समर्पित असणारा सण म्हणजे 'रक्षाबंधन सण'. आज हा सण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांकडून राखी बांधून घेत हा सण त्यांच्या सोबत साजरा केला. वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनीही आनंदाने सर्व कार्यकर्त्यांच औक्षण केलं. त्यांना पेढा भरवला हा क्षण त्यांच्यासाठी खूप आनंदाचा होता. आज घरोघरी रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना. आपल्याला ही कोणीतरी बहीण मानलं आहे. त्याचा आनंद या महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. 

आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते जितेंद्र भावे हे नेहमीच अशा संवेदनशील कार्यक्रमांमुळे प्रसिद्ध असतात. वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला ही आपल्या समाजाचा एक घटक आहेत. त्यांना अस दूर करणे योग्य नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांसोबत ज्या ठिकाणी या महिला राहतात त्या ठिकाणी जाऊन हा रक्षाबंधन सन आनंदात साजरा केला. त्यांना रक्षाबंधनाचे  गिफ्ट म्हणून हेल्थ कार्ड दिले. यामध्ये मेडिकलची 30 ते 50 टक्के पर्यंत सूट असेल.

आम्ही दरवर्षी देवाला राखी बांधून रक्षाबंधन साजरा करायचो कारण आम्हाला या जगात कोणीच नाही असे वाटायचे. आम्हाला सर्व जण नाव ठेवतात. आम्ही हा व्यवसाय का करतो आमची काय मजबुरी आहे हे कोणीच लक्षात घेत नाही. सण- उत्सव काळात तर अक्षरशः आमच्याकडे कोणी ढुंकून देखील पाहत नाही. या काळात आम्ही खूप नाराज असतो. मात्र, आजच्या रक्षाबंधनच्या पवित्र दिवशी जितेंद्र भावे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आम्हाला भेटायला आले. त्यांनी आमचं दुःख समजून घेतल आमच्या हस्ते राखी बांधून घेतली. आम्हाला गोड पेढा भरवला यामुळे आम्हाला खूप आनंद झाला, अशा भावना वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनी यावेळी व्यक्त केल्या 

कोणत्याच महिला या स्वतः या व्यवसायात येत नसतात. त्यांच्यावर हे करण्यास भाग पडत किंवा समाज त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघतो. त्यामुळे या क्षेत्रात त्या येत असतात. त्यामुळे या सर्वच गोष्टींचा विचार होन गरजेचं आहे, असं मत यावेळी आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी व्यक्त केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default