गुंगीचे औषध पाजून अत्याचार केला...
सुरवातीला पंढरपुरात वास्तव्यास असलेली पिडीत तरुण मुलगी पुढे वडगावात राहण्यासाठी गेली. त्यांनतर एक दिवस सय्यद नबी याने तिला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार केला. तसेच अत्याचार करतानाचा तिचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करून ठेवला. यानंतर त्याने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर सतत अत्याचार केला.
मुलगी गर्भवती राहिली...
आरोपीने अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, मुलीच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर सतत अत्याचार केले. त्यांनतर दोन वर्षांपूर्वी ती गर्भवती राहिली. त्यामुळे लग्नाचे आमिष दाखवून पुन्हा अत्याचार सुरूच ठेवला. या काळात पिडीत मुलीला एक मुलगा झाला. त्यामुळे मुलीने सय्यद नबीकडे लग्नाचा तकदा लावला. मात्र आरोपी लग्नासाठी टाळाटाळ केल्याने दोघांमध्ये वाद होऊ लागली. दरम्यान याच वादातून नबीने पिडीत मुलीला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यामुळे अखेर त्या मुलीने पोलिसात धाव घेऊन नबी विरोधात फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला.
