मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिलेने चोरीच्या घटनेची पोलिसांत नोंद केल्यानंतर एका संशयास्पद आरोपीला पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. रईस शेख असं या आरोपीचं नाव आहे. त्यानंतर या आरोपीने चोरी केल्याचं कबुल केलं. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत शेखचा साथीदार शाहरूख निसार खान याला गुजरात मधून ताब्यात घेतलं.
सावधान! रेल्वे ट्रेनमधून प्रवास करताय, प्रवाशांच्या हॅंडबॅग चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
शनिवार, ऑगस्ट २७, २०२२
0
अकोला : रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. रल्वे ट्रेनमध्ये प्रवाशांकडे असणाऱ्या हॅंडबॅगमधून चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने लंपास केल्याच्या घटना घडल्या. मुंबई-नागपूर येथे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसमध्ये प्रवासादरम्यान मुर्तिजापूर रेल्वे स्थानकावर चोरट्यांनी एक महिलेला लुटले. महिलेची हॅंडबॅग चोरून त्यात असलेले १४ तोळे सोने, मोबाईल, ६ हजार रोख रक्कम, कागदपत्रे असा एकूण दहा लाखांहून अधिक रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
Tags
