रस्‍त्‍याच्‍या कामात निकृष्टता; ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे : पंतप्रधान ग्रामसडक योजनेत अंतर्गत सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्‍याचा आरोप नागरीकांनी केला. आहे. हे तात्‍काळ थांबवावे तसेच संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची परिसरातील नागरिकांतर्फे मागणी करण्यात आली आहे. 
साक्री तालुक्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून चिंचपाडा- बोदगांव- भोनगांव- आमोडे- झंजाळे- सामोडे ह्या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. परंतु या रस्त्याच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात निकृष्टता दिसून येत असून जवळपास नऊ मीटरचा असलेला रस्ता फक्त आणि फक्त सहा मीटरमध्ये बसवण्यात आला आहे.

माती मिश्रण करून धोकेदायक काम

ठेकेदारातर्फे या ठिकाणी पूल बांधण्याचे काम सुरू असून या कामात अक्षरशः वाळू ऐवजी माती मिश्रन करून धोकेदायक काम करण्यात येत असल्याचे परिसरातील नागरिकांतर्फे स्पष्ट करण्यात येत आहे. परिसरातील नागरिकांतर्फे हे निकृष्ट काम तात्काळ थांबवण्यात यावे; अशी मागणी करण्यात येत असून संबंधित ठेकेदारास तात्काळ काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default