स्व. तपनभाई पटेल यांच्या जन्मदिनी ५५५ रक्तदात्यांनी रक्तदान करुन वाहिली श्रद्धांजली

फुले शाहू आंबेडकर
0
़धशिपरपूर : मुंबई येथील श्री विलेपार्ले केलवणी मंडळ ट्रस्टी, शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचे नगरसेवक, शिरपूर टेक्स्टाईल पार्क चेअरमन, आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट उपाध्यक्ष स्व. तपनभाई मुकेशभाई पटेल यांच्या जन्मदिनी बुधवारी दि. १७ ऑगस्ट २०२२ रोजी शिरपूर टेक्सटाईल पार्क येथे दिवसभरात ५५५ दात्यांनी रक्तदान करुन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, शिरपूर टेक्स्टाईल पार्क चेअरमन तथा उद्योगपती चिंतनभाई पटेल, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक बबनलाल अग्रवाल, श्री बालाजी संस्थान उपाध्यक्ष गोपाल भंडारी, शिरपूर पीपल्स बँकेचे चेअरमन योगेश भंडारी, जनकभाई पटेल, पंकिलभाई पटेल व अनेक मान्यवर यांच्या हस्ते स्व. तपनभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.

माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल यांच्यासह उद्योगपती स्व. तपनभाई मुकेशभाई पटेल यांनी पटेल परिवाराचा वारसा मोठ्या उमेदीने व जोमाने पुढे नेत तालुक्याच्या विकासात मोठ्या प्रमाणात हातभार लावला होता. तालुक्यासह जिल्हाभरात हजारो युवकांसाठी प्रेरणास्त्रोत बनले होते. काळाने त्यांच्यावर क्रूर आघात करून गेल्या वर्षी ३० सप्टेंबर २०२० रोजी ते आपल्यात राहिले नाहीत. 

त्यांच्या जन्मदिनी बुधवारी दि. १७ ऑगस्ट २०२२ रोजी दुःखद वातावरणात त्यांचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या स्मरणार्थ शिरपूर टेक्सटाईल पार्क, दिसान कॅम्पस येथे दिवसभर ५५५ दात्यांनी रक्तदान करुन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

यावेळी अतुल भंडारी, नितीन अग्रवाल, विजय भंडारी, नीरज भंडारी, विनय भंडारी, अनुज दायमा, कुणाल राठी, संदिप अग्रवाल, रमाकांत गींदोडिया, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, भटू माळी मांडळ, शिरपूर पीपल्स बँक संचालक संजय चौधरी, सामाजिक कार्यकर्ते भालेराव माळी, सहाय्यक सरव्यवस्थापक शरद पगारे, एच. आर. टीमचे सर्व कर्मचारी, जय पाटील, शिरपूर टेक्सटाईल पार्क मधील विविध कंपन्यांचे संचालक, अधिकारी व कर्मचारी तसेच शिरपूर शहर व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

रक्तदान शिबिरासाठी शिरपूर टेक्सटाईल पार्कचे सर्व संचालक, मुकेशभाई पटेल ब्लड बँक शिरपूर, जीवन ज्योती ब्लड बँक धुळे चे पदाधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default