गेम अॅपचा वापर करुन फसवणूक
ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमिर खानने गेमिंग अॅपचा वापर करुन लोकांची फसवणूक केली. आमिर खानने ई-नगेट्स नावाच्या मोबाईल गेमिंग अॅपचा वापर करून युजर्सची फसवणूक केली. आमिरने ई-नगेट्स अॅप लाँच केला. त्यानंतर सुरुवातीला युजर्सला कमिशन देत बक्षिसं दिली. युजर्सच्या वॉलेटमध्ये पैसे पाठवले. त्यानंतर युजर्सचा अॅपवरील विश्वास वाढल्याने युजर्स अॅपमध्ये अधिक पैसे गुंतवू लागले. त्यानंतर आमिरने या अपचा वापर करत युजर्सची फसवणूक केली.
असे' कमवले कोट्यवधी रुपये
अंमलबजावणी संचालनालयाने याबाबत माहिती देत सांगितलं की, युजर्सनी मोबाइल गेमिंग अॅपमध्ये पैसे गुंतवल्यानंतर मोठी रक्कम गोळा झाली. त्यानंतर, या अॅपद्वारे पैसे परत काढण्यासाठी युजर्सवर बंदी आणण्यात आली. सिस्टम अपग्रेडेशन, कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सीद्वारे तपासणी या बहाण्याने अॅपमधून पैसे काढणं अचानक बंद करण्यात आलं. यानंतर, युजर्सच्या प्रोफाइलमधील माहितीसह सर्व डेटा अॅप सर्व्हरवरून हटविला गेला. त्यानंतर युजर्संना आमिरची युक्ती समजली आणि आपली फसवणूक झाल्याचं
कोट्यवधींची फसवणूक
याआधी शनिवारी केंद्रीय तपास यंत्रणांनी मोबाइल गेमिंग ऍप्लिकेशनशी संबंधित तपासासंदर्भात कोलकाता येथे सहा ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली. ईडीने सांगितले की, तपास मोहिमेदरम्यान या प्रकरणाशी संबंधित संस्था बनावट खाती वापरत असल्याचं आणि युजर्सना फसवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलं.
