प्रवेशबंदीतील सानपचा धुळ्यात पोलिसावर हल्ला

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे : गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात प्रवेश बंदी असलेल्या संशयित रोहित सानप याने पोलिस कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार केला. भरत कोष्टी असे जखमी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी (ता. २) रात्री घडली. गणेशोत्सवानिमित्त पोलिस प्रशासनाने ३९ समाजकंटकांना शहरात ३१ ऑगस्ट ते १० सप्टेबरपर्यंत प्रवेशबंदी केली आहे. त्यात रोहित रविकांत सानप (रा. विघ्नहर्ता कॉलनी, देवपूर) याचा समावेश आहे. प्रवेशबंदीचा आदेश झुगारून रोहित घरी आला. त्यामुळे देवपूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी भरत कोष्टी, मिलिंद सोनवणे, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, किरणकुमार साळवे, चव्हाण आदी त्याच्या घरी गेले. त्यावेळी रोहित आक्रमक झाला. त्याने कोष्टी यांची कॉलर पकडून दमदाटी केली. नंतर कोयत्याने त्यांच्यावर वार केला. हा वार चुकविताना कोष्टी यांच्या डाव्या दंडावर दुखापत झाली. पोलिसांनी रोहितला कोयत्यासह अटक केली. त्याच्या विरोधात देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default