मोलमजुरीसाठी लातूरात आलेल्यांना लुटलं; शिवाजीनगर पाेलिसांत गुन्हा दाखल

फुले शाहू आंबेडकर
0
शहरातील देशी केंद्र शाळेच्या समोर असलेल्या मालपाणी कॉम्प्लेक्स येथे झोपलेल्या दोघांकडून जबरदस्तीने रक्कम काढून घेतली व एकावर चाकूचा वार करून जखमी केल्याची घटना घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी पुंडलिक गोवाडे राहणार ढोलकीची वाडी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नाेंदवली आहे. या तक्रारीत मोलमजुरी करण्यासाठी ते लातूर आलेले असून देशिकेंद्र शाळेसमोरील मालपाणी कॉम्प्लेक्स येथे रात्री झाेपले हाेते. रात्री साडे बाराच्या सुमारास अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ आला व मारहाण करून त्याच्याजवळ एक हजार दोनशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच गालावर चाकूचा वार करून जखमी केले. त्याचप्रमाणे तक्रारदार यांचा मित्र गौतम मोरे यांच्या जवळील चारशे रुपये काढून घेतल्याचे ही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलिसांनी दिलेल्या माहिती अशी मालपाणी कॉम्प्लेक्स येथे झोपलेल्या दोघांकडून जबरदस्तीने रक्कम काढून घेतली व एकावर चाकूचा वार करून जखमी केल्याची घटना घडल्याच्या तक्रार नाेंदविण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच संशयित आराेपी पकडले जातील असा विश्वास पाेलिसांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default