दलित सामाजिक बहिष्कार प्रकरणी होणार चौकशी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे : धुळे तालुक्यातील मेहेरगाव येथील दलितांवरील सामाजिक बहिष्कार प्रकरणावर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच अहवाल सादर करण्याचे आदेश देखील दिले आहेत. धुळे तालुक्यातील मेहेरगाव या ठिकाणी दोन गटात जातीय तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन दोन्ही गटाने एकमेकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर एका गटाने सामाजिक बहिष्कार टाकण्यासंदर्भातील तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. या प्रकरणास जिल्हाधिकाऱ्यांतर्फे गंभीरतेने घेत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी, विभागीय दंडाधिकारी, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. या प्रकरणाला जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्यातर्फे संबंधित अधिकाऱ्यांना सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत ‘साम’च्‍या बातमीनंतर दखल या संदर्भातील बातमी साम टीव्हीने प्रसारित केली होती. यानंतर आता प्रशासनातर्फे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जात असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरनाचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचे देखील आदेशित करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default