मोबाईल चोरीचा गुन्हा २४ तासात उघड; ७२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

फुले शाहू आंबेडकर
0
नंदुरबार : नवापूर शहरातील चोरीला गेलेले नवीन मोबाईल, ॲसेसरीज तसेच इतर साहित्य असा सुमारे ७२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात  नवापूर पोलीसांना यश आले आहे. नवापूर पोलीसांनी  संशयितास ताब्यात घेतले आहे.
नवापूर शहरातील बसस्‍थानका समोरील मोबाईल व मोबाईल एसेसरीजचे दुकानाचे मागील बाजुस असलेली लोंखडी खिडकीची ग्रील तोडून नवीन मोबाईल, मोबाईल एसेसरीजचे सामान, स्मार्ट वाँच (घड्याळ) तसेच ड्रावरमध्ये ठेवलेले ६ हजार रुपये रोख असा सुमारे ७९ हजार ६५४ रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आल्याने मोहीन रहेमान शेख यांनी नवापूर पोलीसात फिर्याद दिली होती.

२४ तासात गुन्हा उघड

नवापूर येथील सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी तपासाची चक्रे गतिमान केली असता नवापूर तालुक्यातील खेकडा येथील गोकुळनगरमधील रंजित निलेश मावची याने सदर चोरी केल्याचे लक्षात आले. पोलीसांनी त्यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून ३ नवीन मोबाईल, मोबाईल एसेसरीज, स्मार्ट घड्याळ तसेच रोख रक्कम असे एकुण ७१ हजार ७२६ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी सहा. पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांचे मार्गदर्शनाखाली नवापुर पोलीस स्टेशनचे पथक पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुमानसिंग पाडवी, पोहेकॉ. दादाभाई वाघ, पोना. नितीन नाईक, नामदेव राठोड, संदीप सोनवणे आदींनी केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास हवलदार दादाभाई वाघ करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default