ग्रामपंचायत निवडणूक; माघारीअंती ६ ग्रामपंचायत बिनविरोध

फुले शाहू आंबेडकर
0
नंदुरबार : नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडत आहेत. माघारीच्या अंतिम दिवशी माघार घेण्यासाठी इच्छुकांसह स्थानिक नेत्यांनी गर्दी केली होती. माघारीअंती सहा ग्रामपंचायतींमध्ये सहा लोकनियुक्त सरपंच बिनविरोध झाले आहेत. तर ३२ ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच पदासाठी सरळ लढत रंगणार आहे. 
नंदुरबार जिल्‍ह्यातील ७५ ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणूका  होत आहेत. यात ६१५ सदस्यांच्या जागांसाठी १ हजार १८६ उमेदवार रिंगणात आहेत. तर ७५ सरपंचांसाठी २१९ जण आपले नशीब आजमाविणार असून आजपासून आता ग्रामीण भागात प्रचाराचा धुराळा उडणार आहे. माघारीअंती ७५ पैकी सहा ग्रामपंचायतींमधील लोकनियुक्त सरपंच बिनविरोध झाले आहेत. यामध्ये सुतारे,भवानीपाडा, देवपूर, नटावद, पथराई, वरुळ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

३२ लोकनियुक्त सरपंचांसाठी सरळ लढत

माघारीअंती सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून ३२ ग्रामपंचायतींच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी सरळ लढत रंगणार आहे.यामध्ये अजेपूर, अंबापूर, बिलाडी, आष्टे, बालआमराई, धीरजगाव, गंगापूर, घोगळगाव, पाचोराबारी, जळखे, श्रीरामपूर, शिरवाडे, ठाणेपाडा, विरचक, आर्डीतारा, धुळवद, मालपूर, निंबोणी, निमगाव, राजापूर, शेजवे, वेळावद, इंद्रीहट्टी, दहिंदुले बु, दहिंदुले खु, पिंपरी, सुंदरदे, करजकुपे, होळतर्फे हवेली, खोडसगाव, कोळदे, पळाशी, शिंदे, वाघोदा या ग्रामपंचायतींमध्ये लोकनिुयक्त सरपंच पदासाठी सरळ लढत होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default